
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा व्हर्च्युअल हायब्रीड (ऑनलाइन/ऑनलाइन) सुनावणी घ्यावी, अशी विनंती बॉम्बे बार असोसिएशनने केली आहे.
त्यासंदर्भातील पत्र बार असोसिएशनने हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पाठवले आहे. गेल्या वर्षी कोविड काळात मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. हायकोर्टातील सुनावणी व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात येत होती.
कोविडचा उद्रेक कमी झाल्यानंतर हायकोर्टाने कामकाज प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइनवरून पूर्वीप्रमाणे (फिजिकल हीअरिंग) प्रत्यक्ष सुनावणी सुरू केले होते. मात्र कोविडची सध्याची वाढती परिस्थिती पाहता व्हर्च्युअल सुनावणी घेण्याची विनंती बार असोसिएशनने केली आहे. 19 मार्च रोजी बार असोसिएशनची बैठक घेण्यात आली. त्यावेळी वकिलांच्या बैठकीत व्हर्चुअल हायब्रीड सुनावणीचा निर्णय घेण्याचा आला.



























































