डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

डोंबिवली पूर्वेच्या हायप्रोफाईल रिजन्सी परिसरातील इमारतीमधून ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे परिसरातील रहिकाशांमध्ये खळबळ उडाली असून दामदुप्पट भाडय़ाच्या आमिषापोटी स्कत:ची घरे तिऱ्हाईत क्यक्तींना भाडय़ाने देणाऱया घरमालकांचे डोळेही या घटनेमुळे खाडकन उघडले आहेत. पोलिसांनी दोन महिला दलालांसह पाच पीडित महिलांना ताब्यात घेऊन दोन दलाल महिलांकर ‘पिटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच महिलांपैकी चार बांगलादेशी महिला वेश्याव्यावसाय करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डोंबिकली पूर्व दिवा रस्त्याकरील संदप गावात रिजन्सी परिसरात गंगेश्वर इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील खोली भाडय़ाने घेऊन अनेक महिन्यांपासून बेशरम ऊर्फ सिमरन बेगम बिशाली (34), रोजी ऊर्फ रिया सरदार (28) या दोघी अनैतिक व्यवसाय चालवत होत्या. याबाबत माहिती मिळताच ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे करिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी तिथे बनावट ग्राहक पाठवत सापळा रचून कारवाई केली. दलाल महिला मोबाईलकरून ग्राहकांशी संपर्क करून चांगला मोबदला घेत होत्या, तर बांगलादेशी महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना देहकिक्री करण्यास भाग पाडत होत्या. मिळालेल्या पैशातून केवळ 500 रुपये पीडित महिलांना देत असल्याचे समोर आले असून त्या महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या