तोंडात सुतळी बॉम्ब ठेवत स्फोट घडवला; तरुणाचे कान, नाक गाल उडून भिंतीवर चिकटले

राजस्थानातील बांसवाडा इथे राहणाऱ्या एका तरुणाने अत्यंत वेदनादायी पद्धतीने आपले जीवन संपवले. हिमांशू गोयल असे या तरुणाचे नाव असून त्याने शुक्रवारी दुपारी स्वत:ला घरातील बाथरूममध्ये कोंडून घेत स्फोट घडवला. हिमांशूने स्फोट करताना स्वत:च्या तोंडात पेटवलेला सुतळी बॉम्ब ठेवला होता. या स्फोटामुळे त्याचा जबडा पूर्णपणे फाटला होता. हिमांशूचे कान, नाक आणि गाल उडून बाथरुमच्या भिंतीला चिकटले होते. श्वासनलिका फाटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली तेव्हा हिमांशूच्या आईव्यतिरिक्त कोणी नव्हतं. स्फोटाचा आवाज ऐकून घाबरलेल्या आईने शेजार पाजारच्यांना बोलावून घेतलं होतं. बाथरुमचा दरवाजा तोडल्यानंतर हिमांशू मृतावस्थेत आढळून आला होता.

पोलिसांनी सांगितले की, वाडिया कॉलनीतील रहिवासी हिमांशू गोयल याचा मृतदेह सापडला असून त्याच्या चेहऱ्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून तो आईसोबत राहत होता. हिमांशूची आई शिक्षिका होती आणि काही काळापूर्वी सेवानिवृत्त झाली होती. हिमांशूच्या बहिणीचा विवाह 4 डिसेंबर रोजी संपन्न झाला होता. घरात आनंदाचे वातावरण होते आणि लग्नानंतर पहिल्यांदाच बहीण आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आली होती. शुक्रवार 8 डिसेंबर रोजी हिमांशू दुपारी अचानक घरी आला आणि खोलीत जाऊन झोपला. त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला. यावेळी आईने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने उत्तर दिले नाही. त्याने बाथरूमचा दरवाजा आतून बंद केला आणि तोंडात सुतळी बॉम्ब बांधून स्वत:ला उडवले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर हिमांशूच्या आईला आणि बहिणीला जवळच राहणाऱ्या मामाच्या घरी पाठवले आहे. पोलिसांनी हिमांशूची खोली पोलिसांनी सील केली असून रण्यात आली असून आजूबाजूच्या खोल्यांनाही कुलूप लावण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.