Student Agitation – हिंदुस्थानी भाऊला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाइन घ्या असा हट्ट करत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घरासमोर बेकायदेशीर जमाव करून निदर्शने केल्याप्रकरणी विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ तसेच इकरार खान या दोघांविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. दोघांना कोर्टात हजर केले असता 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केलेले असतानाही विकास पाठक व इकरार खान यांनी शेकडो विद्यार्थ्यांचा जमाव करून वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर सोमवारी निदर्शने केली. यामुळे धारावीत गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे जमाव अधिक प्रक्षोभक होण्याआधी पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून बेकायदेशीर जमलेल्या विद्यार्थ्यांना तेथून पांगवले. दरम्यान, विद्यार्थ्यांचा जमाव करून निदर्शने करणाऱया विकास पाठकविरोधात धारावी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला व इकरार खान यांना अटक केली.