टिप्स – केसांची काळजी घरच्या घरी

केसांच्या गळतीवर उत्तम उपाय म्हणजे तेलाचा मसाज. केसांच्या मुळाशी खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्यास तेल केसांच्या मुळात झिरपतं. केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.

  • आठवडय़ातून एकदा हर्बल शॅम्पू करावा आणि दोनदा खोबरेल तेलाने चांगली मसाज करावी.
  • तेलकट केस धुण्यासाठी रिठय़ाचा वापर करावा. तसेच शॅम्पू वापरत असल्यास आयुर्वेदिक शॅम्पूचा वापर करणे फायद्याचे ठरते.
  • केसांना ऑलिव्ह ऑइल, तीळ, एरंडेल किंवा खोबरेल तेल अशा चांगल्या तेलाने मालीश करावी.
  • ओनियन हेअर पॅक याने केसांसंबंधी अनेक समस्या दूर होऊ शकतात.
  • कांद्याचा रस केसांच्या त्वचेवर लावून अर्धा तास तसेच ठेवून द्या. टॉवेलने केस झाकून घ्या. याने रस मुळात शिरेल. नंतर शॅम्पूने केस धुऊन टाका.
  • तेलकट टाळूमुळे केसांत कोंडा होण्याची शक्यता असते. दही, सफरचंद आणि कोरफड यांचं मिश्रण करून केसांना लावावं. यामुळे केसातील कोंडय़ाची समस्या दूर होते. दह्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची निगा राखली जाते.
  • केसांची वाढ हवी असल्यास नारळ तेलात कांद्याचा रस मिसळा. याने मालीश करून टॉवेल गुंडाळून वाफ घ्यावी. याने केसाच्या त्वचेतील मृत त्वचा नाहीशी होईल आणि केस वाढण्यात मदत मिळेल.
  • अंडय़ाचा पांढरा भाग आणि कांद्याच्या रस मिसळून घ्या. हे मिश्रण अर्धा तासासाठी लावून ठेवावे नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत.
आपली प्रतिक्रिया द्या