चिपळूणमध्ये घरफोडी; ३.३७ लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील मौजे गजमल पिंपळी बुद्रुक येथे घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने एका बंद घराचे कडी-कुलूप तोडून ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. ही चोरी २ ते ७ ऑगस्ट या कालावधीत घर बंद असताना झाली.

याप्रकरणी विलास रघुनाथ गजमल (वय ६१, सध्या रा. परळ भोईवाडा, मुंबई, मूळ रा. गजमल पिंपळी बुद्रुक) यांच्या तक्रारीवरून अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी घराबाहेर असल्याचा फायदा घेत चोरट्याने हत्याराने दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. या घरफोडीत ३,१०,९११ रुपये किमतीचे ४२.१६५ तोळे सोन्याचे दागिने, ६,३२१ रुपये किमतीचे ७४.८ तोळे चांदीचे दागिने आणि २०,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३,३७,२३२ रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला आहे. अलोरे शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.