
बारामती विमानतळावरील धावपट्टीजवळ रविवारी एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. या घटनेमुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने पायलट सुखरूप बचावला आहे. दुर्घटनेनंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सदर परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली. एका खासगी कंपनीचे प्रशिक्षण विमान होते. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. विमानतळावरील धावपट्टीजवळ विमान कोसळल्याची गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

























































