
लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या एका वरिष्ठ कमांडरचा पाकिस्तानात संशयास्पद मृत्यू झाला. कारी सईद अब्दुल अझीझ असे या कमांडरचे नाव आहे. इस्लामाबाद येथील उपहारगृहात जेवण केल्यानंतर काही तासांतच अझीझचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अझीझने नमाज अदा करण्यासाठी कुबा मशीदमध्ये येण्यापूर्वी एका अपरिचित उपाहारगृहात जेवण केले. त्यानंतर मशिदीच्या प्रवेशद्वारावरच तो अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. जम्मू-कश्मीरमधील चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना मदत पुरवणाऱ्या लश्करच्या विभागाची जबाबदारी कारी सईदकडे होती.


























































