
सामना ऑनलाईन । मुंबई
कोनार्क सारंगी यांचे ’हौसला ना रुठे’ हे सिंगल गाणे नुकतेच मुंबईत लॉंच करण्यात आले आहे. 21 ऑगस्ट 1999 ला ओडिसामध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे तेथील लोकांचे जनजीवन उद्ध्वस्त झाले होते. अशा परिस्थितही गुंदलबा या लहानशा गावातील चारू मॉ या सर्वसामान्य महिलेने परिस्थितीपुढे हार मानली नाही. गावातील सगळ्यांना त्यांनी एकत्र आणून पुन्हा आपल्या गावात नंदनवन फुलवले. सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या या चारू माँ यांचा हा प्रवास या गाण्यात दाखवला आहे. गायिका-अभिनेत्री इला अरुण यांनी यात चारू माँ यांची भूमिका साकारली आहे. कोणार्क सारंगी हे कॅलिफोनिर्यास्थित गायक असून पद्मश्री पंडीत रमाकांत गुंदेचा यांचे ते शिष्य आहेत.




























































