
नगर येथील लष्कर हद्दीतील जामखेड आणि सोलापूर रस्त्यांना जोडणारा नगरवाला रस्ता लष्कर प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावर राहणारे आजी – माजी सैनिक, शालेय विद्यार्थी तसेच या रस्त्याचा वापर करणारे इतर नागरिक यांनी शनिवारी स्टेशन हेडक्वार्टरच्या बाहेर उपोषण सुरू केले आहे.
काल उपोषणाचा तिसरा दिवस होता. काल रात्री उपोषण कर्त्यांपैकी परदेशी यांना अस्वस्थ वाटू लागले तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान लष्कर प्रशासनाने अंशत: रस्ता सुरु ठेवण्याची तयारी दाखविली आहे. परंतु उपोषणकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. प्रहार सैनिक संघटना, दरेवडी ग्रामपंचायत यांच्या बरोबरच जिल्ह्यातील इतर सैनिक संघटनांचा उपोषणकर्त्यांना पाठिंबा मिळत आहे.





























































