
निलंगा तालुक्यातील कासार सिरसी येथे शासकीय विश्रामगृहासमोर तलवार आणि हंटर घेऊन थांबलेल्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
कासार सिरसी विश्रामगृहासमोर देविदास विलास भोगिले व अर्जुन अंकुश इनामदार दोघेही (रा. आनंदवाडी, जि. बिदर) थांबलेले होते. देविदास याच्या हातात तलवार होती तर अर्जुनच्या कमरेला हंटर होता. दोघांविरुध्द कासार सिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































