बायको काळी असल्याच्या कारणाने नवर्‍याने केला खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । भंडारा

बायकोचा वर्ण काळा सावळा असल्याने भंडार्‍यात पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

भंडार्‍यातील अंकूश भोंडे याचे लग्न तीन महिन्यापूर्वी मंगालाशी झाले होते. परंतु मंगलाचा वर्ण काळा सावळा असल्याने पती अंकूश सारखा तिला टोमणे मारत आणि तिला मारहाण करत. हा राग अंकूशच्या मनात इतका भरला की त्याने दुसरे लग्न करून गोरी बायको मिळवायची असा निश्चय केला. त्यापूर्वी मंगलाचा काटा काढणे गरजेचे असल्याचे त्याला वाटले. त्यानुसार अंकूशने मंगलाचा गळा दाबून खून केला. नंतर मंगलाचे अपघाती निधन झाल्याचा कांगावा अंकूशने पोलीस स्थानकात केला.

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मंगलाचा गळा आवळल्याचे निशाण सापडले. पोलिसांनी अंकूशला आपला खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी अंकूशला अटक केली असून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मंगलाच्या आईने केली आहे.