परपुरुषाने बघू नये म्हणून पत्नीचे मुंडण, सोलापुरातील धक्कादायक घटना; पतीवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परपुरुषाने आपल्या पत्नीकडे पाहू नये, यासाठी पतीने चक्क 20 वर्षीय पत्नीचे मुंडण केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. पत्नी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर ही बाब उघडकीला आली.

पीडितेचा विवाह जोडबसकण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी मे महिन्यात झाला होता. लग्नानंतर काही दिकसांनीच त्याने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. सासरकडील मंडळी हार बनविण्याचा व्यवसाय करीत असून, सगळेजण तिला एकटीला घरी कोंडून व्यवसायासाठी जात होते. तरीही तिच्यावर नवरा संशय घेत होता. यातूनच पतीने संशय घेत तिला तुझे केस मला आवडत नाहीत, असे म्हणत तिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले. मात्र, पत्नीने त्याला नकार दिला. त्यानंतर तिचा छळ सुरू केल्याने तिने मनावर दगड ठेकून केस कापण्यास होकार दिला. केस कापण्यासाठी नाभिक आल्यानंतरही त्यावेळी आधी तिने विरोध केला, नंतर ती शांत राहिली. त्यानंतर पत्नीचे केस पूर्णत: काढून टाकले. हा प्रकार पीडितेने आपल्या माहेरी सांगितला नाही. काही दिवसांनंतर माहेरच्यांनी कार्यक्रमानिमित्त पीडितेला व जावयाला घरी बोलावले. पतीने पत्नीला माहेरी सोडल्यानंतर पीडितेने हा प्रकार घटना आई-वडिलांना सांगितला. यानंतरही आई-वडिलांनी मुलीला नांदविण्यासाठी घेऊन जातील, असे वाटून याची तक्रार केली नाही, पण 22 दिवसांनंतरही पतीने पीडितेच्या कुटुंबीयांचे फोन घेणे टाळले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जेलरोड पोलीस ठाणे गाठले. याकेळी पोलिसांनी पीडित महिलेची विचारपूस केली. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.