
सामना ऑनलाईन । दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन डे रँकिंगवर हिंदुस्थानी फलंदाज आणि गोलंदाजांची बादशाहत कायम राहिली आहे. टीम इंडियाचा संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या वन डे क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखलं आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर आयसीसीने वन डे क्रिकेटची सुधारित क्रमवारी जाहीर केली आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि पाकिस्तानच्या फखर झमानच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे. गोलंदाजीत हिंदुस्थानाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या करिष्मायी कामगिरीने गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱया स्थानी झेप घेतली आहे.
जगातल्या टॉप टेन फलंदाजाच्या यादीत विराटने पहिले तर हिंदुस्थानीं हिटमॅन रोहित शर्माने दुसरे स्थान मिळवले आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन आठव्या स्थानावर आहे. गोलंदाजीत हिंदुस्थानाचा जसप्रीत बुमराह पहिल्या, कुलदीप यादव तिसऱया तर युजवेंद्र चहल पाचव्या स्थानावर आहे.
वन डे क्रमवारीतले – सर्वोत्तम 10 गोलंदाज
जसप्रीत बुमराह – हिंदुस्थान (841)
राशिद खान – अफगाणिस्तान (788)
कुलदीप यादव – हिंदुस्थान (723)
कगिसो रबाडा – द. आफ्रिका (702)
युजवेंद्र चहल – हिंदुस्थान (683)
आदिल रशिद – इंग्लंड (683)
ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंड (682)
मुजीब झदरान – अफगाणिस्तान (679)
जोश हेजलवूड – ऑस्ट्रेलिया (675)
मुस्तफिजूर रेहमान –
बांगलादेश (671)
वन डे क्रमवारीतले सर्वोत्तम 10 फलंदाज
विराट कोहली – हिंदुस्थान (899 गुणांक )
रोहित शर्मा – हिंदुस्थान (871 )
रॉस टेलर -न्यूझीलंड (808 )
जो रूट – इंग्लंड (807 )
बाबर आझम – पाकिस्तान (802)
डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया (791)
फाफ डु प्लेसिस – द. आफ्रिका (785)
शिखर धवन – हिंदुस्थान (767)
केन विल्यमसन – न्यूझीलंड (756 )
क्विंटन डी कॉक – द. आफ्रिका ( 754 )



























































