Women’s T20 World Cup 2026 – मनधानाचा जलवा, दीप्तीचा कहर; पाकिस्तानला चिरडत हिंदुस्थानची विजयी सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने महिला टी-20 विश्वचषक 2026 मोहिमेची सुरुवात दमदार कामगिरीने करत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 64 धावांनी मोठा विजय मिळवला. एडजबॅस्टन येथे रविवारी झालेल्या या सामन्यात स्मृती मनधानाच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर हिंदुस्थानने 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 170 अशी भक्कम धावसंख्या उभारली. सुरुवातीला हिंदुस्थानला 18 या धावसंख्येवर 2 धक्के बसले होते, मात्र मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मनधानाने 44 चेंडूत 68 धावा केल्या, तर शेवटी ऋचा घोषने 17 चेंडूत 34 धावांची आक्रमक खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.

हिंदुस्थानने दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली, पण मधल्या फळीत नियमित विकेट्स गमावल्याने त्यांची घसरगुंडी उडाली. मुनीबा अलीने 41 धावांची झुंज दिली, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने अप्रतिम गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या, तर श्री चारणीने 3 विकेट्स घेत महत्त्वाची साथ दिली. पाकिस्तानचा डाव अखेर 106 धावांवर संपुष्टात आला आणि हिंदुस्थानने स्पर्धेत विजयी सुरुवात केली.