आयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली

मुंबई, दि. 23 (प्रतिनिधी) – मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रवेशाची मुदत वाढविण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत 23 सप्टेंबर रोजी संपली होती मात्र आता ती 6 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी पदवीस्तरावरील द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स  या अभ्यासक्रमासाठी एमकॉम, या अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रवेश 8 सप्टेंबर पासून सुरू झाले. बुधवारी 23 सप्टेंबर रोजी याची मुदत संपली होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे प्रवेश घेतले नसल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या