गेल्या वर्षीपेक्षा प्रवेश वाढले तरीही आयटीआयच्या 34,806 जागा रिक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) 34806 जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रवेश प्रक्रिया जास्त दिवस राबविण्यात आली होती. त्यामुळे प्रवेशाचा टक्का 4.76 टक्क्यांनी वाढला असला तरी अर्ज केलेल्या 3 लाख 6 हजार 79 विद्यार्थ्यांपैकी केवळ 1 लाख 15393 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला आहे.

प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्लीने तिसऱया पाळीतील तुकडय़ांना प्रवेशाची मान्यता दिल्याने प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी उपलब्ध असलेल्या 1 लाख 47 हजार 806 जागांसाठी 3 लाख 3 हजार 992 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यांपैकी 1 लाख 6 हजार 530 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून प्रवेशाची टक्केवारी 72.07 इतकी होती. यंदा मात्र 76.83 टक्के प्रवेश झाले आहेत. सर्वाधिक प्रवेश पुणे जिह्यातून झाले आहेत. राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अ. दळवी यांनी सांगितले. प्रवेशाची आकडेवारी ही सरकारी आणि खासगी आयआयटी संस्था मिळून आहेत. खासगी संस्थांमधील जागा रिक्त राहिल्याने प्रवेशाचा टक्का कमी दिसत आहे. मात्र सरकारी आयटीआयमध्ये 91 टक्क्यांच्यावर प्रवेश पूर्ण झाले आहेत.

विभागनिहाय प्रवेश

मुंबई 17,664
पुणे 23,159
नागपूर 19,302
नाशिक 21,539
अमरावती 16,453
संभाजीनगर 17,276