बेकायदा बांधकामे, अनधिकृत फेरीवाल्यांची आता खैर नाही, पालिका कारवाईसाठी कंत्राटी कामगार नेमणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील बेकायदा बांधकामे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिका आता खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून कामगारांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा पोहोचऱ्यांना आता चाप बसणार आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थाही सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबईतील बेकायदा बांधकामे, अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या माध्यमातून नियमितपणे कारवाई केली जाते. मात्र अनेक ठिकाणी कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण केले जाते. शिवाय फेरीवाल्यांवरील कारवाईनंतरही हीच स्थिती असते. त्यामुळे  कारवाईसाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यात बोरिवली येथील वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमणे, फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या अतिक्रमण किभागातील थेट अतिक्रमणावर कारकाई करण्याची संबंधित असलेल्या 505 पदापैकी 88 पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने कामगारांची 373 पदांपैकी तब्बल 81 पदे रिक्त आहेत अशी माहिती अलीकडेच माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून समोर आली आहे.

अशी होणार कार्यवाही


  • बोरिवली आर
    /मध्य प्रभागात अतिक्रमण निर्मूलनासाठी पाच काहने आहेत. यातील चार काहने कंत्राटी आहेत. या प्रभागात दोन्ही सत्रांत मिळून 60 कामगारांची गरज आहे.
  • मात्र फक्त 8 कामगार उपलब्ध आहेत. यात एका शिफ्टमध्ये चार आणि दुसऱया शिफ्टमध्ये चार असे कामगार काम करतात. त्यामुळे या ठिकाणी प्रभावीपणे काम करण्यासाठी कंत्राटी कामगार नेमण्यात येणार असून पालिका यासाठी 12 लाख 80 हजार रुपयांचा खर्च करणार आहे.
  • पालिकेने डिसेंबरमध्ये अतिक्रमण निर्मूलनासाठी वाहने भाडय़ाने घेतली आहेत. यामध्ये पश्चिम उपनगरात दोन कर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. आठ तासांची एक शिफ्ट याप्रमाणे 17 हजार 528 शिफ्टसाठी पालिका 4 कोटी 70 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.