पालकमंत्री निलंगेकरांच्या मतदारसंघात 10 लाखांचा गुटखा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

अभय मिरजकर । लातूर

निलंगा तालुक्यातील मौजे गुराळ गावातील एका घरात गुन्हे अन्वेशन पथकाने 29 पोते गुटका केला आहे. जप्त केलल्या गुटख्याची किंमत 10 लाख पाच हजार पाचशे रूपये आहे.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या निलंगा मतदार संघात गुटखा आणि मटक्याची धूम सुरू आहे. बुधवारी दुपारी 4 वाजता निलंगा तालुक्यातील मौजे गुराळ येथील एकाच्या घरामध्ये सुगंधीत गुटखा असल्याची माहिती गुन्हे अन्वेशन विभाग लातूर यांना समजली असता त्यांनी सदरील गावातील घरा मध्ये धाड टाकून 29 मोठ्या सुंगधीत गुटख्याच्या बॅगा पकडून निलंगा पोलिसांच्या स्वाधीन केल्या. 22 बॅगा गुलाम व 7 बॅगा गोवा नामक सुंगधी गुटखा असल्याचा निलंगा पोलीस ठाणे येथे अन्न व भेसळ विभाग लातूर यांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन कार्यालयाकडे घेऊन गेला आहे.