गॅस दरवाढीवर संताप, ओडिशात केंद्रीय मंत्र्यांच्या कारवर अंडी फेकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्याच्या निषेधार्थ बिजू जनता दलाच्या (बीजेडी) कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री बिश्वेश्वर तुडू यांच्या कारवर अंडी फेकली. ओडिशाच्या केंद्रपाराजवळील तिनीमुहनी येथे रविवारी ही घटना घडली. तुडू हे केंद्रपारा स्वायत्त महाविद्यालयात बैठकीसाठी जात होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पेंद्रीय मंत्री तुडू यांनी मला अशा आंदोलनांची पर्वा नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींवर ओडिशात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरवाढीच्या निषेधार्थ सत्ताधारी बीजेडीने सोमवारपासून तीन दिवसीय राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. याचदरम्यान पेंद्रीय जलशक्ती व आदिवासी व्यवहार राज्यमंत्री तुडू यांच्या कारवर अंडी फेकण्याची घटना रविवारी घडली. पेंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे बीजेडीचे प्रवत्ते व्योमकेश रे यांनी सांगितले. त्यांनी भाजपच्या ‘अच्छे दिन’च्या आश्वासनावर प्रश्नचिन्हही उपस्थित केले.