देवगड नगरपंचायतीच्या सेल्फी पॉइंटचा उद्या उद्घाटन सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड एस टी स्टँडसमोरील देवगड नगरपंचायतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचा उद्घाटन सोहळा दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना सचिव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या सोहळ्याला शिवसेना उपनेते तथा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग युवासेना अधिकारी सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटिका निलम सावंत-पालव, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना नेते सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना युवा नेते संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना नेते अतुल रावराणे आणि उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत (काका) राऊत उपस्थित रहाणार आहेत. सर्व उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख, बेसिक, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.