IndvAus टर्नरने सामना फिरवला, हिंदुस्थानचा दारुण पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मोहाली

मधल्या फळीतील फलंदाज अॅस्टॉन टर्नर याने केलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 4 विकेटने दारुण पराभव केला. अॅस्टॉन टर्नर याने 43 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह 84 धावांची आक्रमक खेळी करत ऑस्ट्रेलियाला मालिकेत 2-2 बरोबरी साधून दिली.

त्याआधी नाणेफेक जिंकून हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या दणदणीत शतकाच्या जोरावर 358 धावांचा डोंगर रचला होता. धवनने 143 धावा चोपल्या. परंतु हिंदुस्थानचे गोलंदाज या लक्ष्याचा बचाव करण्यात असमर्थ ठरले. ऑस्ट्रेलियाने 48 व्या षटकातच हे लक्ष्य गाठले.

  • टर्नरने सामना फिरवला
  • 359 धावांच्या लक्ष्याचा अचूक पाठलाग
  • ऑस्ट्रेलियाचा चार विकेटने मोठा विजय
  • ऑस्ट्रेलियाचा सहावा धक्का, कर्री बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या 350 धावा पूर्ण
  • हॅण्डस्कॉम्ब 117 धावांवर बाद
  • ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी

  • शेवटच्या 10 षटकात 98 धावांची आवश्यकता
  • 40 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 261धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाचा चौथा धक्का, मॅक्सवेल बाद

  • हॅण्डस्कॉम्बचे कारकीर्दीतील पहिले शतक

  • ख्वाजा 91 धावांवर बाद, बुमराहने घेतला बळी
  • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, ख्वाजाचे शतक हुकले

  • ख्वाजा-हॅण्डस्कॉम्ब जोडी शतकाच्या नजीक
  • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
  • 30 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 177 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पूर्ण
  • 25 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 145 धावा
  • ख्वाजापाठोपाठ हॅण्डस्कॉम्बचेही अर्धशतक

  • ख्वाजा-हॅण्डस्कॉम्ब जोडी जमली, ख्वाजाचे अर्धशतक

  • 20 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 114 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण
  • दहा षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 72 धावा
  • ख्वाजा-हॅण्डस्कॉम्ब जोडी जमली
  • ऑस्ट्रेलियाच्या 50 धावा पूर्ण
  • दहा षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 47 धावा
  • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, मार्श 6 धावांवर बाद

  • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच शून्यावर बाद

  • ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू
  • हिंदुस्थानचे ऑस्ट्रेलियासमोर 359 धावांचे आव्हान
  • हिंदुस्थानला सलग दोन धक्के, शंकर आणि भुवनेश्वर बाद
  • हिंदुस्थानच्या 350 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानला सहावा धक्का, जाधव

  • 45 षटकानंतर हिंदुस्थानच्या पाच बाद 317 धावा
  • पंतने 24 चेंडूत 36 धावा केल्या
  • हिंदुस्थानला पाचवा धक्का, पंत बाद

  • हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानला चौथा धक्का, राहुल 26 धावांवर बाद
  • 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या  तीन बाद 267 धावा
  • रिचर्डसनने केले सात धावांवर बाद
  • कर्णधार विराट कोहली झटपट बाद

  • 115 चेंडूत ठोकल्या 143 धावा
  • शतकानंतर शिखर धवन बाद

  • हिंदुस्थानच्या 250 धावा पूर्ण
  • 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या दोन बाद 222 धावा
  • 97 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकारासह शतकाला गवसणी

  • एक दिवसीय कारकीर्दीतील 16 वे शतक
  • शिखर धवनचे दणदणीत शतक

  • 92 चेंडूत 7 चौकार, 2 षटाकारांसह 95 धावा केल्या
  • रोहित शर्माचे शतक हुकले

  • 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 182 धावा
  • रोहित-धवन शतकानजीक
  • हिंदुस्थानच्या  बिनबाद 150 धावा पूर्ण
  • 25 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 148 धावा
  • एक दिवसीय कारकीर्दीतील 40 वे अर्धशतक
  • रोहित शर्माचे अर्धशतक

  • 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 114 धावा
  • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
  • एक दिवसीय कारकीर्दीतील 28 वे अर्धशतक
  • शिखर धवनचे अर्धशतक, हिंदुस्थानची दमदार सुरुवात

  • 10 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 58 धावा
  • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
  • धवनची धुवाधार फलंदाजी
  • पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 23 धावा
  • दोन षटकानंतर बिनबाद 6 धावा
  • हिंदुस्थानकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा सलामीचे फलंदाज म्हणून उतरले आहेत.
  • टॉस जिंकल्यानंतर हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या एकदिवसीय सामन्याची सुरुवात झाली असून हिंदुस्थानने टॉस जिंकला आहे.
  • रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनाही फलंदाजीची लय सापडत नसल्याने हिंदुस्थानची भिस्त विराट कोहलीवर असणार आहे.
  • या संपूर्ण मालिकेत फारशी कमाल न दाखवू शकलेला अंबाती रायुडू याला या सामन्यात बाहेर बसवण्याची शक्यता आहे.
    त्यामुळे ऋषभ पंतला पुढील सामन्यांसाठी खेळवलं जाण्याची शक्यता आहे.
  • या मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये महेंद्र सिंग धोनीला आराम देण्यात येईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
  • या सामन्यासाठी प्रेक्षक भलतेच उत्साहात असून बिंद्रा स्टेडिअमबाहेर जल्लोष करत आहेत.
  • त्यामुळे हा सामना निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण, जर या सामन्यात हिंदुस्थानचा विजय झाला तर ही मालिका हिंदुस्थान जिंकेल. पण, जर कांगारूंचा विजय झाला तर पाचवा सामना निर्णायक ठरेल.
  • या एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत हिंदुस्थानने 2-1 अशी मात दिली आहे.
  • दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
  • मोहाली येथील पीसीए आयएस बिंद्र स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.
  • हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना रविवारी 10 मार्च रोजी खेळवला जाणार आहे.