
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य करून अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल अडचणीत आले आहेत. बीसीसीआयची प्रशासकीय समिती या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडूल्जी यांनी दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे. परंतु टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मात्र या दोघांचे समर्थन केले आहे.
पांड्या-राहुलवर निलंबनाची कारवाई? वन डे मालिकेला मुकण्याची शक्यता
या प्रकरणी बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘हार्दिंक पांड्या आणि के.एल. राहुल टीम इंडियाचे सदस्य आहेत. तसेच ते एक जबाबदार क्रिकेटपटू देखील आहेत. परंतु एका शोमध्ये त्यांनी जे मत व्यक्त केले आहे त्याचा संघाशी किंवा खेळाशी काहीही संबंध नाही. हे त्यांचे वैयक्तीक मत आहे. त्यांच्या या मताशी संघाचे काहीही घेणेदेणे नाही. त्यांच्या या वक्तव्याचा संघावर आणि आमच्या कामगिरीवरही काही परिणाम होणार नाही. आता पुढे काय होतेय यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीने संघावर काही परिणाम होईल असेही नाही. हार्दिक पांड्याची जागा भरून काढण्यासाठी आमच्याकडे रविंद्र जाडेजासारखा खेळाडू आहे.’
Virat Kohli on KL Rahul & Hardik Pandya, in Australia: We as the Indian cricket team and responsible cricketers don’t align with those views, those were individual opinions. We are still waiting for a decision to be made. pic.twitter.com/ECSnmyOegC
— ANI (@ANI) January 11, 2019
‘विंडीजविरुद्ध हिंदुस्थानमध्ये खेळलेल्या मालिकेत आमच्याकडे दोन अष्टपैलू खेळाडू होते आणि आताही आमच्याकडे जाडेजा आहे. त्यामुळे चिंता वाटण्याचे काहीही कारण नाही. संघाचे संतुलन साधणारे खेळाडू तुमच्याकडे असली तर ही चांगली बाब आहे’, असेही कोहली म्हणाला.
Virat Kohli on KL Rahul & Hardik Pandya: From the Indian cricket team’s point of view, this changes nothing in our beliefs in the change room, it does nothing to the spirit we have have been able to create. Combinations will have to be thought of once the decision comes out. pic.twitter.com/TDL3FNA4Ta
— ANI (@ANI) January 11, 2019



























































