
हिंदुस्थानच्या पुरूषांच्या हॉकी संघाने रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा फरकाने हरवले. हरमनप्रीतने 21व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मार्टीन फेरेरो याने 28 व 30व्या मिनिटाला गोल करीत अर्जेंटिनाला 2-1ने पुढे नेले. हरमनप्रीतने 60व्या मिनिटाला हिंदुस्थानसाठी दुसरा गोल केला आणि निर्धारीत वेळेत बरोबरी साधून दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये हिंदुस्थानचा गोलकीपर पीआर श्रीजेश याने लुकास विला, मार्टीन फेरेरो व इगनासियो ओर्टीझ यांचे आव्हान परतवून लावले. दिलप्रीत सिंगने हिंदुस्थानसाठी विजयी गोल केला.



























































