सायबर गुन्हे रोखण्यासाठी मदत करा, केंद्र सरकारची ‘मेटा’ला विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मेटा कंपनीने तत्काळ मदत करावी, अशी विनंती केंद्र सरकारने केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ही विनंती केली आहे. देशातील दूरसंचार नियामक मंडळाने यात हस्तक्षेप करण्याची विनंती केल्यानंतर मंत्रालयाने मेटाकडे विनंती केली आहे. सायबर गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधत आहेत. ते सध्या चिंतेचे कारण बनले आहे, असे कृष्णन यांनी म्हटले आहे. व्हॉट्सऍपच्या बाबतीतही युजर्सनी सावधगिरी बाळगणे तसेच वेळीच तक्रारी करणे आवश्यक आहे. काही चुकीच्या गोष्टी घडल्यास एक प्रक्रिया आहे. आयटी नियमांनुसार या कंपन्यांमध्ये तक्रार अधिकारी असणे आवश्यक आहे.

या आधीही देशाच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मेईटीला व्हॉट्सऍप वापरून घोटाळेबाजांकडून आलेले कॉल, मेसेज यांची चौकशी-प्रतिबंध करण्यास सांगितले. त्यामुळे ट्राय व्हॉइस कॉल व एसएमएसच्या संदर्भात काम करत आहे. त्यांना योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे, असे ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.

घोटाळेबाजांना आळा बसणार

व्हॉट्सऍप काही प्रमाणात डॉटला सहकार्य करत आहे. सरकारने विनंती केल्यानुसार बनावट व आर्थिक फसवणूक करणारे मोबाइल नंबर ब्लॉक केले जात आहेत. परंतु तरीही टेलिग्राम आणि सिग्नल प्लॅटफॉर्मवर सध्या कोणतेही नियंत्रण नाही. या ऍपमुळे होणाऱया घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.