
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून नागपुरात पहिला सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच संघ निवडीवरून आता गोंधळ सुरू झाला आहे. माजी निवडकर्ते सुनील जोशी यांनी ‘द वॉल’ अशी ओळख मिळवलेला मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला वगळून टी-20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी द्यावी अशी सुचना केली आहे. याला नेटकऱ्यांसह आजा माजी क्रिकेटपटूंनीही विरोध केला आहे.
नागपुरारात गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी माजी निवडकर्ते सुनील जोशी यांनी अंतिम 11 खेळाडूंचा संघ कोणता असावा हे सांगितले आहे. त्यांनी 11 खेळाडूंची नावे दिली असू यात तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. मात्र पहिल्या कसोटी सामन्यात सूर्यकुमार यादवसाठी चेतेश्वर पुजाराला वगळण्याची सुनील जोशी यांची सूचना माजी भारतीय क्रिकेटपटू दोड्डा गणेश (Dodda Ganesh) यांनी फेटाळून लावली आहे.
Will India line up like this in the first test? Deliberation between Pujara & Surya,a tough draw between both lefties Kuldeep &Axar. Here’s my XI:
R Sharma
Shubhman Gill
Surya (should get first look in )
V Kohli
KL Rahul
KS Bharat
R Ashwin
R Jadeja
Kuldeep Y
M Shami
M Siraj— Sunil Joshi | 🇮🇳 ಸುನಿಲ್ ಜೋಶಿ (@SunilJoshi_Spin) February 7, 2023
माजी निवडकर्त्यांपैकी एकाला असे वाटतेय की पुजाराच्या आधी सूर्यकुमारचा तिसऱ्या स्थानासाठी विचार व्हावा. पुजाराच्या जागी एका अशा खेळाडूची निवड करावी ज्याने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही हे आश्चर्यकारक आहे. पुजारा आयुष्यभर बळीचा बकरा बनत राहिला आहे, असे ट्विट दोड्डा गणेश यांनी केले आहे.
One of the ex selectors wants Surya to be chosen ahead of Pujara for tests. Let that sink in. I mean, the audacity to even think that one can replace Pujara with someone who’s yet to play a test, boggles my mind. No wonder poor Pujara has been a scapegoat all his life #BGT2023
— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (@doddaganesha) February 7, 2023
दरम्यान, टी-20 वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने संपूर्ण निवड समिती बरखास्त केली होतीय. सुनील जोशी यांचीही हकालपट्टी झाली होती. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना पुन्हा संधी देण्यात आली, मात्र त्यांच्या हाताखाली असणारे पॅनेल पूर्णपणे बदलण्यात आले.
दमदार कामगिरी
कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी केलेली आहे. 20 कसोटीत त्याने 54.09च्या सरासरीने आतापर्यंत 1893 धावा कुटल्या आहेत. यात त्याच्या 5 शतकांचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 20 पैकी 9 कसोटी घरच्या मैदानावर खेळल्या आहेत. यात त्याने दोन शतक आणि 5 अर्धशतकांसह 64.29च्या सरासरीने 900 धावा केल्या आहेत.



























































