
पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने यजमान हिंदुस्थानचा पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 9 धावांनी पराभव केला. संजू सॅमसनने विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण दुसऱया बाजूने त्याला साथ न मिळाल्याने हिंदुस्थानचा पराभव झाला. हेन्रीच क्लासेन व डेव्हिड मिलर यांची दणकेबाज नाबाद अर्धशतके व त्यानंतर सर्वच गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजयी सलामी दिली. या विजयासह पाहुण्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे मैदान सुकण्यास उशीर झाल्याने सामना 40-40 षटकांचा करण्यात आला होता.
दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या 250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानला 8 बाद 240 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. हिंदुस्थानकडून श्रेयस अय्यर (50), संजू सॅमसन (नाबाद 86) व शार्दुल ठाकूर (33) या मधल्या फळीतील फलंदाजांनी सामन्यात रंगत निर्माण केली, मात्र ठाकूर बाद झाल्यानंतर हिंदुस्थानच्या हातातून विजय निसटला. सॅमसनने 63 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकारांसह आपली नाबाद खेळी सजविली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने 3, तर कॅगिसो रबाडाने 2 बळी टिपले. वायने पार्नेल, केशव महाराज, तबरैझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 40 षटकांत 4 बाद 249 धावसंख्या उभारली. सलामीवीर क्विंटन डी कॉक (48) वगळता आघाडीची फळी अपयशी ठरल्याने दक्षिण आफ्रिकेची एक वेळ 22.2 षटकांत 4 बाद 110 अशी दुर्दशा झाली होती,





























































