ट्रेनमध्येही मिळणार गरमागरम जेवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गरमागरम जेवण ऑर्डर करता येणार आहे. आयआरसीटीसीच्या नव्या सुविधेतंर्गत ट्रेनमध्ये व्हॉट्सअॅपवरुन ऑनलाईन जेवण ऑर्डर केले जाऊ शकते. रेल्वेची पीएसयू कंपनी आयआरसीटीसीने यासाठी व्हॉट्सअॅप नंबरही जारी केला आहे.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ही सुविधा काही ठराविक शहरांपुरता सुरु केली आहे, येत्या काही दिवसांत अन्य ट्रेनमध्येही ही सुविधा सुरु करण्यात येईल. त्यासाठी प्रवाशांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. रेल्वेने सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ई सेवांना दोन भागात विभागले आहे. आयआरसीटीसी मिळालेल्या वेळेत ई कॅटरींग सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना दिवसभरात 50,000 जेवणाची ताटं देण्यात येतात. जेवणासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळासोबत अॅपच्या माध्यमातून जेवण ऑर्डर केले जाऊ शकते.

रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सेवेचा लाभ घेऊन ट्रेनमध्ये गरमा गरम जेवण मागवू शकता. ई कॅटरिंग सेवेच्या माध्यमातून 8750001323 या क्रमांकावर मेसेज पाठवून जेवण ऑर्डर करु शकतात. रेल्वेने फूड ऑर्डर सुविधेला दोन भागात विभागले आहे. पहिल्या टप्प्यात बिझनेस व्हॉट्सअॅप नंबरवर www.ecatering.irctc.co या लिंकवर क्लिक करुन ई कॅटरींग सेवा हा पर्याय निवडण्यासाठी ई टिकीट बुक करुन ग्राहकांना एक मेसेज केला जाईल.

त्यानंतर ग्राहकाला आयआरसीटीसीच्या ई कॅटरिंग वेबसाईटच्या माध्यमातून थेट स्थानकावर उपलब्ध असलेल्या आवडत्या रेस्टोरेंटमधून जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात तुमचा व्हॉट्सअॅप नंबर वन टू वन संपर्क करेल. या सेवेतंर्गत एआय पावर चाटबॉक्स असेल, जे प्रवाशांना ई कॅटरिंग सेवांबाबतच्या प्रवाशांबाबत उत्तरे देईल आणि जेवण ऑर्डर करण्यासाठी त्याची मदत मिळेल. ई कॅटरिंग सेवांच्या माध्यमातून एका दिवसात जवळपास 50,000 प्लेट उपलब्ध करतात. त्यामुळे तुम्ही संकेतस्थळावरुन किंवा अॅपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर करु शकतो.