
अमेरिकेच्या दबावाखाली मोदी सरकारने एलपीजी आयात धोरणात बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थानने अमेरिकेकडून एलपीजीची आयात वाढवली असून तब्बल ६७ टक्के पुरवठा अमेरिकेकडून होत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली.
‘सीआयआय’तर्फे आयोजित एका कार्यक्रमात हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले, की आपल्या एलपीजी आयातीपैकी सुमारे ६७ टक्के वाटा हा अमेरिकेचा आहे. भारताने सुरुवातीला आपल्या एलपीजीच्या एकूण गरजांपैकी काही हिस्सा अमेरिकेकडून मिळवण्याचे नियोजन केले होते. आधी सुमारे १० टक्के आयात अमेरिकेकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यात आता मोठी वाढ करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी हिंदुस्थानवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावले होते. त्यावेळी अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्याचे दोन्ही देशांमध्ये ठरले होते. मात्र, हा करार अमेरिकेच्या बाजूनेच एकतर्फी असल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे.

























































