
पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणला मुलाखत देण्यास नकार दिल्याच्या बातम्या पाकिस्तानात पसरल्या होत्या. या बातम्यांचे खंडन पठाणने केले आहे. ‘या बातम्या पूर्णपणे खोट्या असून, सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोंमध्ये माझा चेहरा फोटोशॉप करण्यात आला आहे’, असे पठाणने स्पष्ट केले आहे. इरफान म्हणाला, बाबरने त्याला मुलाखत देण्यास नकार दिला होता, अशी एक खोटी बातमी पाकिस्तानमध्ये पसरली होती. मात्र, ट्रोलिंग आणि खोटी माहिती पसरवण्याच्या घटना दररोज घडतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे बंधनकारक नाही. बाबरच्या बाबतीत पसरवण्यात येणाऱ्या बातमीमध्ये माझा चेहरा दुसऱ्या कोणाच्या तरी फोटोवर फोटोशॉप करून लावण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानी माध्यमांमध्ये पसरवण्यात येणारी ती बातमी पूर्णपणे खोटी होती.
तो बांगलादेशी पत्रकाराचा फोटो मूळ फोटो एका तरुण बांगलादेशी पत्रकाराचा होता. तो पहिल्यांदाच मैदानावर गेला होता आणि त्याला मुलाखत नाकारण्यात आली होती. त्यांनी त्याच्या शरीरावर माझा चेहरा लावून ही बातमी पसरवली. तो फोटो दहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आणि लोकांना वाटले की तो मीच आहे, असेही इरफानने स्पष्ट केले.

























































