‘आयएनएस विराट’चा शेवटचा प्रवास सुरू! 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नौदलातून निवृत्त, गुजरातच्या अलंग येथे यार्डात ‘स्क्रॅप’ होणार

नौदलात प्रदीर्घ 30 वर्षांची सेवा बजावून आयएनएस विराट निवृत्त झाले असून या युद्धनौकेने शनिवारी आपला शेवटचा प्रवास सुरू केला. मुंबईहून गुजरातच्या अलंग येथे आयएनएस विराटला पाठवण्यात आले असून तेथे या युद्धनौकेचे ‘स्क्रॅप’ करण्यात येणार आहे.

देशाच्या सागरी सीमेवर पहारा देण्यासाठी 1984 मध्ये हिंदुस्थानने ब्रिटनकडून ही युद्धनौका खरेदी केली. त्यापूर्वी ही युद्धनौका ब्रिटिश रॉयल आर्मीमध्ये सेवा देत होती. प्रिन्स चार्ल्स यांनीही या नौकेवर आपली नौदल अधिकारी म्हणून काम केले आहे. फॉकलंड युद्धात या युद्धनौकेने अपूर्व कर्तबगारी गाजवली. 1987 मध्ये आयएनएस विराट असे बारसे करून या युद्धनौकेला नौदलात सामील करण्यात आले. आयएनएस विक्रांतबरोबर आयएनएस विराटने तब्बल 30 वर्षे देशांच्या सागरी सीमांचे रक्षण केले. 1997 मध्ये आयएनएस विक्रांत निवृत्त झाल्यानंतर 20 वर्षे ही जबाबदारी एकटय़ा आयएनएस विराटनेच सांभाळली. मार्च 2017 मध्ये आयएनएस विराटला निवृत्त करण्यात आले.

आयएनएस विराटची कामगिरी

1987 मध्ये नौदलात सामील झाल्यानंतर दोनच वर्षांनी आयएनएस विराटला श्रीलंकेत राबवण्यात येणाऱया ऑपरेशन ज्यूपिटरमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या काळात आयएनएस विराटने अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. 2001 मध्ये संसद हल्ल्यानंतर ऑपरेशन पराक्रम राबवण्यात आले. यातही आयएनएस विराटचा सहभाग होता. आयएनएस विराटने तब्बल 2252 दिवस समुद्रात घालवले असून 27 वेळा सागरी परिक्रमा केली आहे. देशाच्या सागरी सीमेवर पहारा देण्यासाठी 1984 मध्ये हिंदुस्थानने ब्रिटनकडून ही युद्धनौका खरेदी केली. त्यापूर्वी ही युद्धनौका ब्रिटिश रॉयल आर्मीमध्ये सेवा देत होती.

आपली प्रतिक्रिया द्या