सावधान! इन्स्टाग्राम विकतेय तुमची खासगी माहिती; पी क्लाऊडचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही इन्स्टाग्राम किंवा फेसबुकचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण युजरचा पर्सनल डेटा गोळा करण्यात इन्स्टाग्राम हे अॅप आघाडीवर असून त्यापाठोपाठ फेसबुकचा नंबर लागतो. क्लाऊड स्टोरेज पंपनी पी क्लाऊडच्या माहितीनुसार मार्पेटिंगसाठी इन्स्टाग्राम अॅप युजरचा तब्बल 79 टक्के पर्सनल डेटा थर्ड पार्टीसोबत शेअर करते. म्हणजेच पैसे कमावण्यासाठी तुमचा डेटा इन्स्टाग्रामकडून थर्ड पार्टीला विकला जातो. यामध्ये युजरची पर्चेसिंग इन्फर्मेशन, पर्सनल डेटा आणि ब्राऊजिंग हिस्ट्रीचा समावेश आहे. या डेटाचा उपयोग इन्स्टाग्राम फेसबुकची उत्पादने विकण्यासाठी करते. या डेटाच्या आधारावरच ग्राहकांना जाहिराती दिसतात.

पी क्लाऊडने अॅप स्टोअरच्या नवीन प्रायव्हसी लेबलवर आधारित डेटा कलेक्ट केला होता. त्यानुसार 56 टक्के डेटा थर्ड पार्टीसोबत शेअर करणारे फेसबुक दुसऱया क्रमांकावर आहे. 50 टक्के डेटा शेअरिंगसह लिंक्डइन आणि उबर इट्स अनुक्रमे तिसऱया आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

हे अॅप सुरक्षित 

पी क्लाऊडच्या माहितीनुसार सिग्नल, नेटफ्लिक्स, क्लबहाऊस, स्काइप, मायक्रोसॉफ्ट टर्म्स, गुगल क्लासरूमसारखे अॅप्स युजरचा कोणताही डेटा गोळा करत नाहीत. त्यामुळे हे अॅप सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. बिगो, लाइव्ह, लाइकसारखे अॅप युजरचा केवळ 2 टक्के डेटा गोळा करतात असेही पी क्लाऊडने म्हटले आहे.