कश्मीरमध्ये इसिस ‘लोन वुल्फ’ अटॅकच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना इसिस कश्मीरमध्ये सक्रीय झाल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणाच्या हाती लागली आहे. टेलिग्राम ग्रुपच्या नावाने इसिसचे कमांडर कश्मिरी तरुणांची माथी भडकवत असून त्यांना लोन वुल्फ अटॅकचे प्रशिक्षिण देत आहेत. विशेष म्हणजे यात कश्मिरी महिलांचाही उपयोग करण्यात येत आहे.

‘Willayah Kashmir’ नावाचा ग्रुप हा टेलिग्राम ग्रुप चालवत आहे. अशी माहिती गुप्तचर यंत्रणेच्या हाती आली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून कश्मिरी तरुणी व महिला इसिसचा प्रचार करत आहेत. या टेलिग्राम ग्रुपमध्ये कश्मीरचे २३३ तरुण सहभागी झाले आहेत. सीरियातील इसिसच्या कमांडरच्या मार्गदर्शनाखाली ‘Willayah Kashmir’ काम करत आहे. हे कमांडर कश्मिरी तरुण-तरुणींना हिंदुस्थानच्या विरोधात भडकवण्याचे काम करत आहे. त्यासाठी टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे ब्रेनवॉशिंग केले जात असल्याचा धक्कादायक खुलासा गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीत झाला आहे. तसेच कश्मिरी तरुण-तरुणींना घरातल्या घरात विस्फोटकं बनवण्याचेही प्रशिक्षण इसिस देत आहे.

इसिस टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून कोडवर्डचा वापर करत आहेत. काडवर्डमधूनच कश्मिरी तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात आहे. गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी इसिसकडून ‘VeraCript’ मध्ये माहिती टेलिग्राम ग्रुपमधील सदस्यांना पाठवली जात आहे. जी फक्त त्यांच्याच सदस्यांना कळू शकते. याआधी २०१७ मध्येही कश्मीरमध्ये इसिस आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर इसिसने लगेचच या ग्रुपचे नाव बदलले होते. जमात-उल इस्लामच्या नंतर कश्मीरमध्ये इसिसची ‘Willayah Kashmir’ सक्रीय झाल्याने सुरक्षा दलापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.