
इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या हंगामात आज रविवारी ‘सुपर संडे’च्या दिवशी एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम आमनेसामने येणार आहे. विराट कोहलीचा संघ विजयरथावर आरुढ आहे, तर चेन्नईचा संघही काही कमी नाही. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये दमदार सामना होण्याची आशा क्रीडा चाहत्यांना आहे.
आयपीएल इतिहासामध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 26 वेळा आमनेसामने आलेआहेत. यात धोनीच्या संघाने 16 वेळा बाजी मारली आहे, तर कोहलीचा संघ 9 सामने जिंकला आहे. तसेच एक सामन्याचा काही कारणास्तव निकाल लागला नाही. मात्र हे समिकरण बदलण्यासाठी कोहली ब्रिगेड आज मैदानात उतरेल, तर बंगळुरुच्या संघावरील आपली दादागिरी कायम राखण्यासाठी चेन्नईचा संघ आपला अनुभव पणाला लावेल.
IPL 2021 एकही चेंडू न खेळता मॉर्गन विचित्र पद्धतीने बाद, ‘गंभीर’च्या लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी
सलग चार विजय
आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकू न शकलेला आरसीबीचा संघ यंदा तुफान फॉर्मात आहे. विराटच्या नेतृत्वाखाली या संघाने यंदा सलामीचे चारही सामने जिंकले आहेत. हा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे धोनीच्या संघानेही पहिला सामना गमावल्यानंतर विजयाची हॅटट्रीक लगावली आहे.



























































