Ipl 2022 अहमदाबाद संघाचे नाव ‘गुजरात टायटन्स’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) नवीन फ्रेंचायझी टीम अहमदाबाद संघाने आपले नाव आता जाहीर केले आहे. अहमदाबाद फ्रेंचायझी आयपीएलच्या 15 व्या हंगामात ‘गुजरात टायटन्स’ या नावाने मैदानात उतरणार आहे. आज बुधवारी ही घोषणा करण्यात आली. याआधी हा संघ ‘अहमदाबाद टायटन्स’ नावाने ओळखला जाणार असे वृत्त समोर आले होते.

अहमदाबादने अष्टपैलू हार्दिक पांडय़ाला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे, तर शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा स्टार फिरकीवीर राशिद खान यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षण स्टाफमध्ये आशीष नेहरा आणि गॅरी कर्स्टनचा समावेश आहे.

हार्दिक, राशिदला प्रत्येकी 15-15 कोटी

अहमदाबादने राशिद आणि हार्दिकला प्रत्येकी 15-15 कोटी रुपयांत संघाशी जोडले आहे. हार्दिक पांडय़ा याआधी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता, तर राशिद खान आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता.