
इंडियन प्रीमियर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर झाले यंदाचे सामने हे 31 मार्च ते 28 मे दरम्यान खेळवले जाणार आहेत. पहिला सामना हा 31 मार्च रोजी रोजी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स व चेन्नई सुपरकिंग्जमध्ये होणार आहे.
यंदाचा हा आयपीएलचा 16 वा सिझन असून सर्व सामने हे देशाअतंर्गत होणार आहेत. साखळी फेरीत एकूण 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्ले ऑफचे चार सामने खेळवले जातील. त्यातून जिंकलेल्या दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार.
यावर्षी सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात येणार असून ग्रृपस्टेजमध्ये प्रत्येक संघ हा 14 सामने खेळणार आहे. अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स हे संघ तर ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स हे संघ आहेत.
या ठिकाणी होणार सामने
यंदाचे आयपीएलचे सामने हे 12 ठिकाणी होणार आहेत. अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी, धर्मशाला या स्टेडियमवर सामने खेळवले जातील.





























































