IPL 2024 : ‘हा’ खेळाडू ठरतोय अनलकी? अर्धशतक झळकावलं तरी मुंबईचा होतोय पराभव

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला अद्यापतरी म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने आतापर्यंत 9 सामने खेळले असून 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 27 एप्रिल 2024 रोजी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्मा एकटा लढला मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर 10 धावांनी दिल्लीने मुंबईचा पराभव केला. दरम्यान तिलकच अर्धशतक मुंबईसाठी अनलकी ठरतंय अशी चर्चा सध्या क्रिडा वर्तुळात रंगली आहे. कारण जेव्हा जेव्हा त्याने अर्धशतक झळवलय तेव्हा तेव्हा मुंबईचा पराभव झाला आहे.

तिलक वर्मा मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील एक महत्वाचा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा गरज पडलीये तेव्हा तेव्हा त्याने मुंबईसाठी चांगल्या धावा केल्या आहेत. तिलकने आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा अर्धशतक झळकावली आहेत. 2022 मध्ये दोन, 2023 मध्ये एक आणि 2024 मध्ये आत्तापर्यंत तीन अर्धशतक झळकावली आहेत. मात्र या सर्व सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. त्यामुळे तिलक वर्माचं अर्धशतक मुंबईसाठी अनलकी ठरतय का? अशी कुजबुज चाहत्यांमध्ये होत आहे.

2022 मध्ये तिलकचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. 2022 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरुद्ध अनुक्रमे 61 आणि 51 धावांची खेळी होती. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्कारावा लागला.

आयपीएल 2023 मध्ये तिलक वर्माने एकमेव अर्धशतक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरद्ध 2 एप्रिल 2023 रोजी झळकावले होते. त्याने नाबाद 84 धावांची वादळी खेळी केली होती. मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

हिंदुस्थानला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे ‘गुरू’ बनले पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक, पीसीबीने दिली अपडेट

IPL 2024 मध्ये तिलक वर्माने आतापर्यंत सनराझर्स हैदराबदविरुद्ध 64 धावा, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 65 धावा आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 63 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. पण दुर्दैवाने या तीन्ही सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे.