
सामना ऑनलाईन। लाहोर
इंडियन प्रीमियर लीग (IPL)ची भुरळ फक्त क्रिकेट चाहत्यांनाच नाही तर खेळाडूंनाही पडल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमल (28) याच्यावरही IPL ची जादू चढली असून त्याच्या जीभेवरही IPL चेच नाव आहे. हे स्पष्ट करणारा एक किस्सा नुकताच घडला असून सोशल मीडियावरही त्याची चर्चा आहे.

क्वेट्टा ग्लेडिएटरतर्फे खेळणारा उमर अकमल सोशल मीडियावर PSL बद्दल बोलताना चक्क IPL बोलला. पण त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याला आपली चूक झाल्याचे लक्षात आले व त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण सोशल मीडियावर त्याचे IPL प्रेम व्हायरल झाले आहे. त्या व्हिडीओत ‘ क्वेट्टाची टीम कराचीत आली असून आम्ही घरच्याच मैदानावर खेळत आहोत. यामुळे प्रेक्षक आम्हांला जितके प्रोत्साहन देईल तितकीच चांगली कामगिरी आमची टीम करेल. सर्वच टीमला जर प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिलं तर तो दिवस फार लांब नाही जेव्हा IPL, सॉरी PSL येथे होईल. असे उमर म्हणाल्याचे दिसत आहे.
Subhan Allah … pic.twitter.com/kjHzIz4yxO
— Taimoor Zaman (@taimoor_ze) March 9, 2019

























































