आयपीएलच्या इतिहासात विराटचा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
विराट कोहली - आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक 5878 धावांची नोंद आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने राजस्थानरॉयल्स विरुद्धच्या झालेल्या सामन्यात इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात प्रथम 6 हजार धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. या सामन्याआधी विराट कोहलीच्या नावावर 5 हजार 949 धावा होत्या. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 178 धावांचे आव्हान उभे केले होते. देवदत्त पडिकल आणि विराट कोहली या जोडीने हे आव्हान लिलया पार केले. या सामन्यात विराट कोहलीने 34 चेंडूत आयपीएलमधील 40वे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर 35व्या चेंडूवर चौकार मारत आयपीएलमधील 6 हजार धावा टप्पा पार केला.