
महाराष्ट्रासह हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट आली असून याचा फटका आयपीएल या टी-20 स्पर्धेला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील दहा ग्राऊंड्समन व बीसीसीआयच्या आयोजन समितीतील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
याचे परिणाम 9 एप्रिलपासून सुरू होणाऱया आयपीएलमधील लढतींवर होण्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईसाठी पर्यायी स्थळ म्हणून हैदराबाद ठेवण्यात आलेले आहे. पण आता आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी कमी अवधी उरला आहे. त्यामुळे हैदराबाद जरी पर्यायी स्थळ ठेवण्यात आले असले तरी लढतींची स्थळं बदलण्यात येणार नाहीत. मुंबईत यशस्वीपणे लढती पार पडतील, असा विश्वास बीसीसीआयकडून यावेळी व्यक्त करण्यात आला.
वानखेडे स्टेडियममधील दहा ग्राऊंड्समनना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना व्लिगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. आयपीएल लढतींचे आयोजन मुंबईत कायम ठेवण्यात आल्यास कांदिवली येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) क्लब्समधील पाच ते सहा ग्राऊंड्समनना बोलावण्यात येणार आहेत, अशी माहिती एमसीएच्या सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.
खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरण
बीसीसीआयच्या आयोजन समितीतील सदस्यांना कोरोना झाला असला तरी त्याचा संसर्ग खेळाडूंना होणार नाही. आयपीएलमधील सहभागी संघांतील खेळाडूंसाठी विशेष बायो बबल (जैव सुरक्षित वातावरण) तयार करण्यात आले आहे. तसेच आयपीएलच्या लढतींसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यानंतरही मुंबईतील लढती नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असा विश्वास बीसीसीआयच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला.
दिल्ली, चेन्नई संघातही कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाचा संसर्ग हा मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाहीए. दिल्ली पॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यालाही कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच चेन्नई सुपरकिंग्जमधील एका सदस्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील कुणालाही कोरोनाची लागण नसल्याचे चेन्नई सुपरकिंग्जच्या व्यवस्थापनाकडून यावेळी सांगण्यात आले आहे.
मुंबापुरीत ‘दस का दम’
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दहा सामने होणार आहेत. 10 एप्रिल रोजी मुंबईत पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज व दिल्ली पॅपिटल्स यांच्यामध्ये ही लढत रंगेल. 10 ते 25 एप्रिल या कालावधीत या लढती पार पडतील.
इव्हेंट मॅनेजमेंट बीसीसीआयकडेच
गेल्या वर्षापर्यंत आयपीएल या स्पर्धेचे इव्हेंट मॅनेजमेंट बीसीसीआयने आयएमजी या पंपनीकडे दिले होते. या वर्षी बीसीसीआय स्वतः इव्हेट मॅनेजमेंट व ऑपरेशन्सकडे लक्ष देत आहे. तसेच बीसीसीआयच्या मेडिकलचे टीमकडे सध्याच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष आहे. बीसीसीआयने वाढत्या कोरोनाकडे लक्ष देता स्टाफही वाढवला आहे.
आयोजन करणाऱया असोसिएशन सतर्क
कोरोना संसर्गामुळे मुंबईतील आयपीएल लढतींवर टांगती तलवार निर्माण झाल्यामुळे बीसीसीआयने इतर असोसिएशनला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे कठोर पालन करण्यासाठी या सर्व असोसिएशन सज्ज झाल्या आहेत. दिल्ली अॅण्ड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने तर आपल्या स्टाफ मेंबर्सला कोरोना लस द्यायलाही सुरुवात केली आहे.
संघांचा सराव इतरत्र
आयपीएलमधील काही संघांचा सहभाग मुंबईत सुरू आहे. मात्र क्रिकेटपटू वानखेडे स्टेडियमवर सराव करीत नाहीत. दिल्ली पॅपिटल्सचा संघ ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये तर पंजाब किंग्जचा संघ वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सराव करीत आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्सचा संघ नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये प्रॅक्टिस करीत आहे.

































































