आयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जादा मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱया लाखो रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ मिळणार आहे.

आयआरसीटीसीच्या साइटवरून पूर्वी रात्री 11.30 वाजेपर्यंत तिकीट बुकिंगची सोय होती. आता रात्री 11.45 वाजेपर्यंत प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे. जुन्या व्यवस्थेनुसार आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा मुख्य सर्व्हर आधी एक तास बंद असायचा; पण आता हा सर्व्हर केवळ 45 मिनिटे बंद असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जादा अवधी मिळणार आहे. ई तिकीटिंग व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नुकतेच आयआरसीटीसीने सिंगापूरहून पाच नवीन सर्व्हर मागवले आहेत.