IRCTC वरून विमानाचे तिकीट काढल्यास 50 लाखांचे विमा कवच मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

रेल्वे तिकीटं बुक करण्यासाठी आणि खानपान सेवा मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या IRCTC या कंपनीने विमानांची तिकीटे काढणे, हॉटेलचे बुकींग करणे यासारख्या सुविधाही द्यायला सुरुवात केली आहे. या कंपनीने हवाई प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोफत विमा कवच देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीद्वारे विमानाचे तिकीट काढल्यास प्रवाशाला ५० लाख रूपयांचे विमा कवच मिळेल असं कंपनीचे अध्यक्ष एम.पी.माल यांनी सांगितलं आहे.

सगळ्या हवाई कंपन्या प्रवाशांना विमा कवच प्रदान करत असतात. मात्र त्यासाठी प्रवाशांकडूनच ठराविक रक्कम घेतली जाते. आयआरसीटीसीने हे विमा कवच मोफत देण्याचं ठरवलं आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी कंपनीकडून तिकीटं नोंदवणाऱ्यांना ही सेवा मिळेल असं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे.