11 कर्मचाऱयांच्या वारसांना मिळाली जे. जे. रुग्णालयातच नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर जे. जे. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱयांच्या 11 वारसांना रुग्णालयातच नोकरी मिळाली. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेकडून यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या नियुक्तीपत्रक वाटप सोहळय़ास सर जे. जे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे, मुख्य प्रशासकीय अधिकारी सोनावणे, प्रशासकीय अधिकारी गोसावी, दीपक लाड, अनिल दळवी व संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ राणे, सचिव यशवंत दळवी व संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.