लेकीसाठी… जान में जान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेरी झोली मे डाल दे तेरी एक मुस्कान, आ जाये मेरी जान में जान… दोन वर्षांपूर्की आनंद सहस्रबुद्धे यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत युटय़ूबकर लाँच झाले होते. हृषिकेश रानडे यांनी गायलेल्या या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गीत आज  प्रमुख ऑडियो प्लॅटफॉर्मकर रिलीज झाले आहे.

 ‘जान में जान’ या गाण्यामागील प्रेरणा सांगताना, आनंद सहस्रबुद्धे म्हणाले, माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी तिला गाणं भेट देतो. ‘जान में जान’ हे गाणं मी तिल्या सातव्या वाढदिवसाला दिले. खरं तर त्यावेळी मुलीची तब्बेत ठीक नव्हती. ती मलूल झाली होती. तिने हसावं असं सारखं वाटत होतं. त्यातूनच ‘मेरी झोली में डाल दे तेरी एक मुस्कान…’ या ओळी मला सुचल्या. फक्त मुखडा तयार झाला. त्यानंतर मी अमेरिकेत असताना एका दमात सर्व गाणं लिहिलं. त्यावेळी मी लेकीपासून दूर होतो. पुढे हे गीत रोमँटिक सोलो म्हणून आम्ही रिलीज केले.

‘जान में जान’ हे गाणे आता स्पॉटिफाय, गाना डॉट कॉम, जिओसाकन, ऍमेझॉन, ऍपल या प्लॅटफॉर्मकर ऐकता येईल.