jammu kashmir snowfall- जम्मू-कश्मीरचा झाला डीप फ्रिजर, पाराही कुडकुडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jammu-kashmir-snow

सामना ऑनलाईन । मुंबई

उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट कायम असून जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये अनेक भागात बर्फाची चादर पसरली आहे. जम्मू-कश्मीरमधील गुलमर्ग येथे आज तापमानाचा पारा -11 अंश सेल्सिअस इतका खाली उतरला आहे. सर्वसाधारणपणे घरात वापरल्या जाणाऱ्या फ्रीजच्या फ्रीजरमध्ये 0 अंश सेल्सिअस ते -18 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. त्यामुळे संपूर्ण जम्मू-कश्मीरच डीप फ्रीजर झाल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-कश्मीरच्या अनेक भागात हिमवर्षा सुरू आहे. काही भागात तर घरांवर रस्त्यांवर दोन ते तीन फूट बर्फ साठला आहे. पर्यटक या वातावरणाचा आनंद लुटत आहेत. मात्र काही भागात अति हिमवर्षावामुळे पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. हिंदुस्थानचे लष्कर, कश्मीर पोलीस, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी ठिकठिकाणी वाहतूक सुरळीत राहावी आणि तसेच लोकांना मदत व्हावी म्हणून कार्यरत आहेत.