Jawan Movie – धर्म बदलून हिंदू झालेल्या या अभिनेत्रीची जीवनकहाणी थक्क करणारी आहे

तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत देखणी अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) ही प्रचंड प्रसिद्ध आहे. अभिनय आणि सौंदर्य यामुळे तिचे जगभरात असंख्य चाहते आहेत. 38 वर्षांची ही अभिनेत् जुळ्या मुलांची आई झाली आहे. नयनताराचं लग्न विघ्नेश सिवन याच्याशी झालं होतं.

नयनताराचे यापूर्वी 4 जणांशी ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. यातील 2 प्रेमकरणे प्रचंड गाजली होती. सिंबू नावाच्या एका अभिनेत्यासोबत तिचे सर्वात आधी नाव जोडण्यात आले होते. या दोघांचे एकमेकांचे चुंबन घेतानाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यामुळे नयनतारा भडकली होती आणि तिने यापुढे सिंबूसोबत कधीही काम करणार नाही असे जाहीर केले होते.

नयनताराचे सगळ्यात गाजलेलं प्रेमप्रकरण हे अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवासोबत होतं. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र त्यावेळी प्रभू देवा हा विवाहीत होता. नयनतारा त्याच्या प्रेमातच इतकी बुडाली होती की तिने त्याच्या नावाचा टॅटूही गोंदवला होता. 2010 साली हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सगळ्यांना कळाले होते. या बातमीमुळे प्रभू देवाची बायको भयंकर चिडली होती. तिने न्यायालयात धाव घेतली आणि त्याद्वारे प्रभूदेवा आणि नयनतारा लग्न करू शकणार नाही अशा स्वरुपाचा आदेश प्राप्त केला.

नयनताराचे खरे नाव डायना मरिअम कुरिअन होते. तिने ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश केला होता. तिने धर्म परिवर्तन प्रभू देवाशी लग्न करण्यासाठी केले होते असं म्हटलं जातं, मात्र तिने स्वत: याबाबत आजपर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाहीये.

नयनताराचं दिग्दर्शक विघ्नेश सिवनवर प्रेम जडलं होतं आणि तिने त्याच्याशीच लग्न केलं. हे दोघेजण जुळ्या मुलांचे पालक बनले आहेत. Naanum Rowdy Dhaan नानुम रावडी धान या चित्रपटापासून या दोघांमध्ये प्रेमांकुर फुलला असं सांगितलं जातं. या चित्रपटात नयनतारा प्रमुख भूमिकेमध्ये होती आणि चित्रपटाचं दिग्दर्शन विघ्नेशने केलं होतं. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये नयनताराने ती विघ्नेशवर प्रेम करत असल्याची जाहीर कबुली दिली होती.