जेईई मेनमध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा राज्यात पहिला; देशातील 14 विद्यार्थ्यांना 100 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन सत्र-1 परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सोमवारी सकाळी जाहीर केला. या परीक्षेत 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळाले असून यात केवळ एका मुलीचा समावेश आहे. 100 पर्सेंटाईल मिळविणाऱया विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक उमेदवार हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आहेत. या परीक्षेत नागपुरातील अद्वय क्रिष्णा या विद्यार्थ्याला 99.9984486 पर्सेंटाईल मिळाले असून महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान त्याने पटकावला आहे.

देशभरातील एकूण 8 लाख 72 हजार 432 विद्यार्थ्यांनी जेईई मेन सत्र-1 च्या (बीई, बीटेक)परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 7 लाख 69 हजार 589 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 21 हजार 719 मुली तर 5 लाख 47 हजार 867 मुले होती. यंदा 3 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा दिली. जेईई मेन 2022 च्या दोन्ही सत्रांनंतर आधीच जाहीर केलेल्या धोरणानुसार सत्र-1 आणि सत्र-2 पैकी सर्वोत्तम गुण विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या श्रेणी जाहीर केल्या जातील, असे एनटीएकडून जाहीर करण्यात आले आहे.

यंदा जेईई मेन 407 शहरांमधील 588 परीक्षा पेंद्रांवर आयोजित करण्यात आली होती, ज्यात हिंदुस्थानबाहेरील 17 शहरांचा समावेश होता. मनामा, दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजाह, सिंगापूर, कुवेत सिटी, क्वालालंपूर, लागोस/अबुजा, कोलंबो, जकार्ता, व्हिएन्ना, मॉस्को, पोर्ट लुई आणि बँकॉक येथील परीक्षा पेंद्रावर जेईई मेन परीक्षा पार पडली.

100 पर्सेंटाईल मिळविणारे विद्यार्थी

1. जस्ती यशवंत वी. वी. एस., तेलंगणा
2. सार्थक माहेश्वरी, हरयाणा
3. अनिकेत चट्टोपाध्याय, तेलंगणा
4. धीरज कुरुपुंडा, तेलंगणा
5. कोय्याना सुहास, आंध्र प्रदेश
6. कुशाग्र श्रीवास्तव, झारखंड
7. मृणाल गर्ग, पंजाब
8. स्नेहा पारीक, आसाम
9. नव्या, राजस्थान
10. पेनिकलापती रवि किशोर, आंध्र प्रदेश
11. पोलिशेट्टी कार्तिकेय, आंध्र प्रदेश
12 बोया हरेन सात्विक, कर्नाटक
13. सुमित्रा गर्ग, उत्तर प्रदेश
14. रूपेश बियाणी, तेलंगणा