वंचितांना मदतीचा हात, जहांगीर कलादालनात चित्र, सिरॅमिक्स आणि शिल्पांचे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरीब, वंचितांना शिक्षण, आरोग्य क्षेत्रात मदतीचा हात देण्यासाठी दिल्लीतील ‘जोश’ या समाजसेवी संस्थेच्या वतीने जहांगीर कलादालनात विविध कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. कला रसिकांना हे प्रदर्शन बुधवारपासून 6 जूनपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत निःशुल्क बघता येणार आहे.

‘जोश’ या संस्थेने पहिल्याच कला प्रदर्शनाचे आयोजन मुंबईत केले आहे. कलाकृतींच्या विक्रीतून मिळणारा काही निधी सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. ‘व्हिज्युअल रिअलम्स ऑफ लाईफ’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे. प्रदर्शनात सुहास बहुलकर, प्रकाश बाळ जोशी, रतन साहा, नीलेश पवार यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांसह अनेक नवोदितांचाही समावेश आहे. चित्रकला, शिल्पकला, सिरॅमिक्स, प्रिंट्स अशा क्षेत्रातील हे कलाकार आहेत.