
‘झलक दिखला जा 11’ चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला असून मनीषा रानी या पर्वाची विजेती ठरल्याची चर्चा आहे. या सेलिब्रिटी डान्स रिॲलिटी शोचा महाअंतिम सोहळा रविवार, 3 फेब्रुवारी 2024 रोजी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. यावेळी सारा अली खान, विजय वर्मा आणि हुमा कुरेशी यांसारख्या अनेक कलाकारांनी या ग्रँड फिनालेमध्ये भाग घेतला होता.
मनीषा राणी ‘झलक दिखला जा 11’ जामध्ये वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून आली होती. जर ही चर्चा खरी ठरली तर वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून मनीषा राणीने नवा विक्रम केल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘झलक दिखला जा’ च्या ग्रँड फिनालेमध्ये मनीषा राणीसह अद्रिजा सिन्हा, शोएब इब्राहिमनेही टॉप 3 मध्ये स्थान मिळवले होते. शोच्या अंतिम फेरीत, मनीषाने तिच्या दोन सहकाऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक मते मिळवून ‘झलक दिखला जा’ सीझन 11 ची ट्रॉफी जिंकली. शोचा ग्रँड फिनाले मुंबईतील एका प्रसिद्ध स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला.,.
Breaking #JDJ11 as per early reports
History Rewritten #Wildcard wins#ManishaRani is winner of #JhalakDikhhlaJaa11
Confirmation awaits. pic.twitter.com/zbGL7ucYZf— The Khabri (@TheKhabriTweets) February 29, 2024
सोनी टीव्हीचा हा डान्स रिॲलिटी शो अधिक रंजक बनवण्यासाठी निर्मात्यांनी मनीषा राणी, धनश्री वर्मा, सागर पारेख, आवेज दरबार, ग्लेन सलडाना आणि निकिता गांधी यांचा शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून समावेश केला. मात्र, झलकच्या विजेत्याबाबत अद्याप निर्माते किंवा मनीषा राणी यांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही.





























































