
शिवसेनेसोबत गद्दारी करून भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेल्या गद्दार मिंध्यांना भाजपकडून चांगलाच धक्का मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपसोबत एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या मिंध्यांना भाजप एकटं पाडणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारा जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ‘भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नुकतीच एक बैठक पार पडली असून त्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असे ठरवण्यात आले आहे’, असे या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
‘नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही”, असे जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात मिंधे व अजित पवार गटाची भाजप गोची करणार असल्याची चर्चा रंगली आहे.


























































